Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचा दावा ABP Majha

Continues below advertisement

बातमी विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेदावरुन मविआत रंगलेल्या स्पर्धेची. महाराष्ट्रातील सत्ता बदलानंतर शिवसेनेने विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा ठोकला आहे. विधी मंडळ सचिवालयाला शिवसेनेनं पत्र दिलंय. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांना विरोधी पक्षनेते बनवण्याच्या तयारीत आहेत. विधान परिषदेत शिवसेनेचे ११ तर काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० सदस्य आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांना विरोधी पक्ष नेता करण्याच्या भूमिकेत असून काँग्रेसकडून मोहन कदम, राजेश राठोड, सतेज पाटील यांची नावे चर्चेत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीनं गेली विधानसभा निवडणूक लढली होती. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पद पटकवण्यासाठी प्रसंगी दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram