Mumbai Unlock : नव्या अटीमुळं मुंबईतील अनेक माॅल्स अद्यापही बंद! ABP Majha
Continues below advertisement
राज्यात अनेक ठिकाणी निर्बंधांमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेची अंमलबजावणी होणार आहे. खासकरून राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकानं रात्री दहावाजेपर्यंत उघडे राहतील. मात्र, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासोबतच खाजगी कार्यालये, लोकल ट्रेन यासाठीही सूट देण्यात आली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना महाराष्ट्र अनलॉक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यभरातून अनलाॅकचे हे चित्र असताना मुंबईत अनेक माॅल मात्र बंद ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार कामगार वर्गाचे सुद्धा दोन डोस झालेले नाहीत त्यामुळे माॅल उघडण्यास अद्याप परवानगी मिळत नसल्याने व्यापारी वर्गाकडून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Corona Mumbai Latest Marathi News Abp Majha Maharashtra Unlock Mumbai News Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Maharashtra Unlock Guidelines ABP Majha Mumbai Unlock Mumbai Corona Cases: ABP Majha Video