Mumbai Local : लोकल प्रवासाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आज कामाचा पहिला दिवस ABP Majha

Continues below advertisement

मुंबई : आज सोमवारपासून महाराष्ट्रात निर्बंध शिथील होण्याची अंमलबजावणी होणार आहे. खासकरून राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकानं रात्री दहावाजेपर्यंत उघडी ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. मात्र, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना आणि या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासोबतच खाजगी कार्यालये, लोकल ट्रेन यासाठीही सूट देण्यात आली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना महाराष्ट्र अनलॉक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हे करताना जर रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन करणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात येणार असून, लवकरच ती सुरु करण्यात येणार आहे. पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामांन्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.

लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन प्रवासासाठी विशिष्ट पास देण्यात येणार आहेत. या पासवर क्यूआर कोड असणार आहे. हा पास ‘युनिव्हर्सल पास’ म्हणून ओळखला जाईल. हा पास लोकल ट्रेनसोबतच मेट्रो, मोनोरेल त्याचप्रमाणे मॉल किंवा इतर ठिकाणी सुद्धा चालू शकणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola