Maharashtra Temperature : मुंबईत पारा 40 अंशाच्या वर जाणार ? विदर्भात पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट
Continues below advertisement
Maharashtra Temperature : मुंबईत पारा 40 अंशाच्या वर जाणार ? विदर्भात पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट चंद्रपूरसह विदर्भातील काही भागात पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याचा इशारा देण्यात आलाय. सध्या विदर्भातील पारा ४० अंशावर पोहोचलाय. तर मुंबई महानगर प्रदेश परिसरातही उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. कमाल तापमान ४० अंशावर जाण्याची शक्यता आहे. तर मुंबईलगतच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही कमाल तापमान ४० अंशांवर जाण्याची चिन्ह आहेत. तर कल्याणमधील तापमान ४२ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज आहे. आज आणि उद्या उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Continues below advertisement