Maharashtra School Reopening : शाळा सुरु कराव्यात की करु नये? संभ्रम वाढला
Continues below advertisement
कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नाही, तिसऱ्या लाटेचा धोका वारंवार वर्तवण्यात येतोयआणि लसीकरणाची काय बोंब आहे हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. अशातच शाळा सुरु कराव्यात की करु नये याबाबत ग्रामीण आणि शहरातल्या पालकांमध्ये परस्पर विरोधी सूर ऐकायला मिळतोय. शाळा सुरु करण्यासंदर्भात शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून पालकांची मतं जाणून घेतली जाताहेत. शाळा सुरु करण्याबाबत ग्रामीण भागातल्या पालकांची तयारी असल्याचं या सर्वेक्षणानुसार कळतंय. तर मुंबईसह इतर प्रमुख शहरातल्या पालकांनी शाळा सुरु करण्यास नकारघंटा वाजवली आहे. दरम्यान कोविडमुक्त गावातील शाळा सुरु करण्यास सरकारनं हिरवा कंदील दिलाय. अशातच जोपर्यंत लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाऊ नये असं मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नोंदवलंय.
Continues below advertisement