Mumbai Rain : मुंबईकरांनो सावध राहा! मुंबईसह उपनगरांत पुढील 2-3 तासांत मुसळधार पावसाचा इशारा
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामूळे पाऊस लांबण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार आज सकाळपासूनचं मुंबईसह उपनगरात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत आहे. कुर्ला परिसरात मागील पाऊण तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने देखील आपल्या सर्व विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.