Maharashtra Political Crisis | शिवसेना, NCP चिन्ह प्रकरण: सुप्रीम कोर्टात १६ जुलैला सुनावणी
शिवसेनेच्या चिन्हाच्या मुद्द्यावरती आज ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका असल्यामुळे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेच्या चिन्हाबाबतही अंतरिम आदेश देण्यात यावेत असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला. याआधीच ठाकरेंचा हा युक्तिवाद फेटाळून लावण्यात आला होता. दोन निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत असा युक्तिवाद चिन्हांच्या शिवसेनेने केला. 'ठाकरेंच्या मागणीवरती आता तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता काय' असा सवाल न्यायमूर्ती सुंदरेश यांनी केला. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी सोळा जुलैला होणार आहे. हे प्रकरण सोळा जुलैला नक्की लिस्ट होईल असे सांगण्यात आले आहे, कारण यापूर्वी हे प्रकरण लिस्ट व्हायचे आणि मग फायनल लिस्ट मधून ते डिलीट व्हायचे. सोळा जुलैला हे प्रकरण शिवसेना पक्ष आणि चिन्हाचे ऐकले जाईल. जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर कोर्ट नंबर दोन मध्ये याची सुनावणी होईल. योगायोगाने त्याच दिवशी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचे प्रकरणही जस्टिस सूर्यकांत ऐकणार आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेना पक्ष आणि चिन्ह तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह ही प्रकरणे सोळा जुलैला सुप्रीम कोर्टात ऐकली जातील.