Maharashtra Mankhurd News : मुंबईच्या मानखुर्दमधील म्हाडा कॉलनीत काल रात्री जमावाकडून तोडफोड
Maharashtra Mankhurd News : मुंबईच्या मानखुर्दमधील म्हाडा कॉलनीत काल रात्री जमावाकडून तोडफोड करण्यात आली. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काल (रविवारी) 15-20 जणांच्या जमावानं परिसरातील गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.