Anil Deshmukh PC | महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांनी माफी मागावी : गृहमंत्री अनिल देशमुख

Continues below advertisement

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात एम्समधील डॉक्टरांच्या पॅनलचा अहवाल समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा जनता माफ करणार नाही, असं अनिल देशमुख म्हणाले. यासोबत महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना प्रचाराला बिहाराचे भाजप प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस जाणार का असा सवालही देशमुख यांनी विचारला.

ज्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्त्व केलं, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांचं नेतृत्त्व केलं, त्या देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांचा तपाय योग्य दिशेने सुरु नसल्याचं म्हटलं होतं. ज्या पद्धतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम काही पक्षांमार्फत झालं, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं काम झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही.

बिहारमधील माजी पोलीस संचालक आता निवडणूक लढत आहेत. तर महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस बिहारचे भाजप प्रभारी आहेत. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस तिथे जाणार का? असा माझा त्यांना प्रश्न आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram