Maharashtra govt sets up SIT on BMC : मुंबई महापालिकेच्या कामांतील अनियमिततेची चौकशी होणार

 मुंबई महापालिकेत साडेबारा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं कॅगच्या अहवालात आलं असून, मुंबई महापालिकेच्या कामातल्या अनियमिततेची चौकशी होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आहे. या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा फडणवीसांनी कल्याणमधल्या जाहीर सभेत बोलताना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola