Maha Student App : राज्यात E-Governance, शाळांमध्ये दांडी मारणाऱ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
आता प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थी यांची महा स्टुडंट अॅपच्या माध्यमातून हजेरी लावली जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे. दांडी मारणारे शिक्षक आणि विद्यार्थी यांना चाप लावण्यासाठी या अॅपची मोठी मदत होणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्यात.. प्रत्येक तासिकेला किती विद्यार्थी आणि कोणते शिक्षक उपस्थित होते याची नोंद ठेवणं आता शक्य होणार आहे.