Cruise Drugs प्रकरणाचा तपास सुमोटो पद्धतीनं महाराष्ट्र पोलिसांनी करावा : संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

 सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi)  यानं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी दिली आहे.  एबीपी माझाशी बोलताना एनसीबी (NCB) रेडचे पंच क्रमांक 1 असलेले प्रभाकर साईल यांनी सांगितलं की, त्यांची या प्रकरणात पंच म्हणून सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लँक होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटला बोलवलं आणि त्यानंतर साईलनं गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं.  सईलनं सांगितलं की, माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचिताकडे सोलापूरला 10-12 दिवस राहिलो, असं किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईलनं सांगितलं आहे. यावर संजय राऊत यांनीही आता प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram