Maharashtra Day 2023 : राज्य स्थापनेच्या 63 वा वर्धापनदिन, राजभवनाला आकर्षक रोषणाई : ABP Majha

Continues below advertisement

उद्या १ मे महाराष्ट्र दिन.. आपल्या राज्य स्थापनेच्या ६३वा वर्धापनदिन.. याचनिमित्त  राजभवनाला आकर्षक रोषणाई करण्यात आली.. तर दुसरीकडे पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयालदेखील रोषणाई न्हाऊन निघालं. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्यातची निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचं स्मरण यादिवशी केलं जातं.. त्याचप्रमाणे १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरु लागली होती आणि इथूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्याची चळवळ सुरु झाली..यामध्ये १०६ जणांना वीरमरण आलं. याच हुतात्म्यांच्या बलिदानार्थ १९६५ मध्ये हुतात्मा स्मारकाची निर्मिती करण्यात आली याच स्मारकाच्या ठिकाणी मध्यरात्री उद्धव ठाकरे जाऊन अभिवादन करणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram