ABP News

Maharashtra CM vs Governor : भाजप आमदारांकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा एकदा लेटर वॉर पाहयाला मिळत आहे.  राज्यातील महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था याविषयी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, असे निर्देश देणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.  "हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपालानी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी", असे मुख्यंत्र्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजप आमदारांकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी करण्यात आली आहे. राज्यपालांच्या पत्राला दिलेल्या उत्तरावर भाजपची नाराजी . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram