Uddhav Thackeray Interview | मातोश्री ते मंत्रालय प्रवास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत | ABP Majha
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्वाशी तडजोड केली का? बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला आपल्याला मुख्यमंत्री बनवायचं आहे, असं उद्धव ठाकरे का म्हणतात? उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची २५ वर्षांची मैत्री तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी का केली?.... या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत मिळणार आहेत. 'सामना'चे कार्यकारी संपादक सजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या पहिल्या भागात मुख्यमंत्र्यांनी मातोश्री ते मंत्रालय या प्रवासावर दिलखुलास उत्तरं दिली आहे. पाहूयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग.