Maharashtra Cabinet : केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेची शक्यता ABP Majha

Continues below advertisement

 एकीकडे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक ईडीच्या रडारवर असताना दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.. गेले काही महिने राज्यातील नेते, त्यांचे निकटवर्तीय, नातेवाईक यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांची छापेमारी आणि कारवाई सुरू आहे.. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंथन होणार आहे.. दुसरीकडे एसटीचं विलीनीकरण करता येणार नसल्याचा अहवालही या बैठकीत मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेय. कोर्टाच्या आदेशानं नेमण्यात आलेल्या समितीनं याबाबतचा अहवाल दिल्यानंतर कोर्टाकडून त्याबाबत विचारणा झाली होती. त्यानंतर त्वरित कारवाई करत हा अहवाल आज बैठकीत मांडला जाणार आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram