Maharashtra Cabinet Expansion : Sahyadri Guest house वर बैठक सुरु होणार ABP Majha

Continues below advertisement

लवकरच.... लवकरच... लवकरच... मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मिळणारं उत्तर.... आणि हा लवकरचचा दिवस आज उजाडलाय.. सकाळी ११ वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे... भाजप आणि शिंदे गटाचे मिळून १६ ते २० आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय. काल उशीरा रात्रीपर्यंत शिंदे गटाच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन निवासस्थानी खलबतं सुरू होती.. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी देखील संभाव्य मंत्र्यांची डिनर टेबलवर चर्चा झाली...एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन ४० दिवस उलटलेत.... आणि आता ४० दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय.. दरम्यान आज पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होणार नाहीय.. शिवसेनेतील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगानं निकाल जाहीर केल्यानंतर पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जातंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram