Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र महत्वाची खाती भाजपकडेच?

Continues below advertisement

Maharashtra Cabinet Expansion : 40 दिवसांपासून रखडलेला शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी (9 ऑगस्ट) पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे (Eknath Shinde) नऊ तर भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.  मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुणाला कोणतं खातं मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याची संपूर्ण यादी समोर आली आहे. यामध्ये शिंदे गटाकडे मुख्यमंत्रीपदासाह 12 खाती देण्यात आली आहेत. तर भाजपकडे उप मुख्यमंत्रीपदासाह 14 खाती आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram