Maharashtra : अवकाळीमुळे मेटाकुटीला आलेले शेतकरी, शेतमालांच्या पडलेल्या दरांचा मुद्दा गाजणार
Continues below advertisement
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडाही वादळी ठरण्याची शक्यता आहे... तीन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मेटाकुटीला आलेले शेतकरी... या पार्श्वभूमिवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे... हे सरकार सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणत असले तरी शेतमालाचे पडलेले भाव, नुकसान भरपाईत होणारी दिरंगाई पाहिली तर शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचत नाही का, असा सवाल उपस्थित होतोय... म्हणूनच अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल... दरम्यान, आक्रमक विरोधक सकाळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आणि नंतर सभागृहात आक्रमक राहतील, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय...
Continues below advertisement