Maharashtra Assembly Session: शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
Continues below advertisement
Maharashtra Assembly Session Aaditya Thackeray: विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या (Shivsena rebel mla) आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाच लक्ष्य केले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळांच्या पायऱ्यावर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. आम्ही मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणार नसल्याचे वारंवारपणे शिंदे गटाकडून सांगण्यात येत होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून शिंदे गटाने मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केले आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Assembly Session - Aditya Thackeray Shinde Group Aditya Thackeray Aditya Thackeray Banner