Mahaparinirvan Din 2021 : महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी चैत्यभूमीवर ABP Majha

आज ६ डिसेंबर... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५वा महापरिनिर्वाण दिन... महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींची पावलं चैत्यभूमीकडे वळलीत. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख, सामाजिक न्यायमंत्र धनंजय मुंडे, चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. ओमायक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर गर्दी करु नये आणि घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं असं आवाहन प्रशासनाने केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर महापालिकेकडून कोरोना चाचणी आणि लसीकरणाचीही विशेष व्यवस्था करण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola