Mahaparinirvaan Day Local Train : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेवर 12 विशेष लोकल
abp majha web team
Updated at:
05 Dec 2023 12:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर चैत्यभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी जमा होते. महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी राज्यासह देशभरात लाखो अनुयायी येत असतात. गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. ५ आणि ६ डिसेंबर मध्यरात्री परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेलदरम्यान या १२ विशेष लोकल गाड्या धावणार असून सर्व स्थानकांवर थांबतील.