Lower Parel Bridge : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; लोअर परळ ब्रीजची एक मार्गिका सुरू होणार
Lower Parel Bridge : गेली पाच वर्षे रखडलेला लोअर परळ ब्रीज (Lower Parel Bridge) सुरू होण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण येत्या 18 तारखेला पुलाच्या दुसऱ्या बाजूची एक मार्गिका सुरू होणार आहे. लोअर परळहून (Lower Parel) प्रभादेवीकडे (Prabhadevi) जाणारी मार्गिका 3 जून रोजी सुरू करण्यात आली होती. लोअर परळहून करी रोडकडे जाणारी एक मार्गिका येत्या सोमवारी सुरू होणार आहे. प्रभादेवी, वरळी, करी रोड आणि लोअर परळच्या रहिवाशांसाठी, तसंच लोअर परळमध्ये नोकरीनिमित्तानं दररोज येणाऱ्यांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे.