Lower Parel Bridge : पाच वर्षानंतर लोअर परळचा पूल खुला , गणेशोत्सवाआधी डिलाईल पूल सुरू
अखेर ५ वर्षानंतर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आणि लोअर परळ परिसरातील डिलाईल पूल आज सुरु झाला. श्रेयवादाचं राजकारण टाळण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाने सामंजस्याची भूमिका घेत पुलाचं उद्घाटन केलं.. बाप्पाच्या आगमनासाठीच पुलाचं उद्घाटन केल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.. तर डिलाईल पूल गणेशोत्सवाआधी खुला झाला नाही तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते पुलावरुन गणपती नेतील असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला होता.. ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन आणि दिपक केसरकरांच्या उपस्थितीत पुलाचं उद्घाटन करण्यात आलं..