Traffic : ठाणे-भिवंडी, ठाणे-कल्याण रोडवर वाहतूक कोंडी, ठाणे-बोरिवली मार्गावर लांबच लांब रांगा
ठाणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत जात आहे, रोजच मुंबई नाशिक हायवे वरील खड्डयांमुळे वाहन चालक हैराण झाले आहेत. याचे कारण साकेत ब्रिज जवळ असणारा निमुळता रस्ता आणि त्यावरील खड्डे हे आहे. माजिवडा नाका इथून येणारी वाहने पुढे 2 लेनच्या साकेत ब्रीजवर अडकतात आणि त्याचा परिणाम मागून येणाऱ्या वाहनांवर होतोय. तसेच खारेगाव टोल नाका इथे देखील खड्डे असल्याने साकेत ब्रिजवर वाहने हळू हळू पुढे जातात, या सर्वाचा परिणाम ठाणे शहरातील वाहतुकीवर होतोय.