Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल
Continues below advertisement
Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, आज दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे हेमंत गोडसे आणि दिंडोरीमधून भारती पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के, तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांनी अर्ज दाखल केलाय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. मुंबई उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर, मुंबई उत्तर मधून काँग्रेसचे भूषण पाटील, पालघरमधून ठाकरे गटाच्या भारती कामडी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर भिवंडीतून शरद पवार गटाच्या सुरेश म्हात्रे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
Continues below advertisement