Mumbai Unlock : मुंबईत आजपासून ‘अनलॉक’ला सुरुवात ; सम-विषम पद्धतीनं दुकानं सुरु राहणार
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सर्व अत्यावश्यक आणि बिगर अत्यावश्यक दुकाने सुरु राहतील. दुकाने सुरु करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर दुसऱ्या बाजूची दुकाने मंगळवार आणि गुरुवार अशी सुरु राहतील. तर शनिवार रविवार आवश्यकतेनुसार दुकाने बंद राहतील.
Tags :
Maharashtra Mumbai Uddhav Thackeray Mumbai Unlock Covid-19 Covid-19 In Mumbai Covid Lockdown Lockdown Relaxation In Mumbai Odd-even Rule Non-essential Shops Unlock Mumbai