Lockdown 3 | मुंबईतील शिथिलता रद्द, महापालिका आयुक्तांचा निर्णय; केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार
महाराष्ट्र शासनाने 4 मे पासून लॉकडाऊन कालावधीत काही अटी-शर्थी घालून काही सेवा सुरू करायला परवानगी दिली होती. मात्र मुंबईत देण्यात आलेली शिथिलता रद्द करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी विशेष अधिकारात सर्व शिथीलता रद्द करुन केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.