मुंबई लोकल अडीच तास खोळंबली, प्रवाशांना रुळावर चालण्याची वेळ, मुंबईची लाईफलाईन झाली ठप्प!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे ठप्प झाली, घरे आणि कार्यालायातील वीज गायब झाली, दमट हवामानात लोक अक्षरश: घामाघूम झाले...काही काळ ही अवस्था होती मुंबईची. सोमवारी सकाळी अचानकपणे मुंबई आणि मुंबई महानगर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. अचानकपणे संपूर्ण मुबंईची एकाचवेळी वीज खंडित झाली हे इतिहासात पहिल्यांदाच घडत होते. तिन्ही मार्गाच्या लोकल सेवा ठप्प झाल्या. या लोकल सेवा अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी वापरण्यात येत आहेत. सर्व खासगी कार्यालयांसह शासकीय कार्यालयेही बंद झाली. न्यायालयाचेही कामकाज काही वेळेसाठी बंद झाले. रस्त्यावरचे सिग्नल व्यवस्थाही थांबली.