Mumbai Local : सर्वांसाठी लोकल प्रवास लवकरच, 15 तारखेपर्यंत लोकल सुरु होण्याची शक्यता

लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे...दिवाळी नंतरच्या आठवड्यांतील कोरोनाबाबतच्या आकड्यांमधला सकारात्मक कल लक्षात घेता प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण होईल...या बैठकीत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते...

येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी असणार आहेत. १५ डिसेंबरनंतर सर्वांसाठी लोकलप्रवास खुला करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

"येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात ११-१२ डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात करोना स्थितीचा आढावा घेऊन लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल", असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola