Yakub Memon Graveyard : याकूब मेमनच्या कबरीसाठी वेगळं मीटर, स्थानिक रहिवाशांची माहिती
दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरुन सध्या राजकारण तापलंय.. अशातच या कबरीसंदर्भात मोठी माहिती समोर आलीय.. याकूबच्या कबरीसाठी वेगळं वीज मीटर बसवण्यात आल्याचा दावा बडा कब्रस्तानमधील स्थानिक शाहिद शेख यांनी केलाय.. या रोषणाईसाठी खासगी स्वीच आणि मीटर पुरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितलंय.. या रोषणाईला विरोध केल्याने अंडरवर्ल्डच्या नावाने धमक्या देण्यात आल्याचा आरोपही शाहिद शेख यांनी केलाय.. याकूब मेमनची कबर बनविण्याच्या सर्व प्रक्रियेत विश्वस्त कार्यालयात रात्रीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहितीही शेख यांनी दिलीय. तसंच बडा कब्रस्तानचे विश्वस्त शोएब खतीबने याकूबची कबर रऊफ मेमनला विकल्याचा दावाही शाहिद शेख यांनी केलाय.. खतीबने गेल्या दोन वर्षात अनेक कबरी विकल्यात. बहुतेक व्यवहार रऊफच्या मदतीने करण्यात आल्याचा दावाही शेख यांनी केलाय..