Mira Road Death : उघड्या चेंबरमध्ये पडून चिमुरड्याचा मृत्यू, चेंडू काढताना तोल जाऊन जीव गेला

मिरा रोडच्या एका सोसायटीतील चेंबरमध्ये पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शब्बी जाफरी असं या चिमुरड्याचं नाव आहे. तो गौरव समृद्धी सोसायटीत आई-वडिलांसह राहत होता. शब्बी हा आपल्या सोसायटीच्या आवारात खेळत होता, त्यावेळी त्याच्याकडील चेंडू सोसायटीच्या लगत असलेल्या एस.टी.पी. प्लान्टमधील उघड्या चेंबरमध्ये पडला. हा चेंडू काढण्य़ाच्या प्रयत्नात 5 वर्षाचा चिमुरडा तोल जावून आठ फूट खोल चेंबरमध्ये पडला. चेंबरजवळ त्याची चप्पल दिसल्याने खाली उतरुन शोध घेतला असता त्याचा मृतदेह मिळाला. बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे चिमुरड्याचा बळी गेल्याचा आरोप सोसायटीच्या रहिवाशांनी केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola