Lingayat Community Mumbai :मुंबईत आज लिंगायत समाजाचा महामोर्चा,राज्यासह परराज्यातून लाखो लोक सहभागी

अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्या वतीने आज मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा राज्यव्यापी महामोर्चा निघणार असून लाखो लिंगायत बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. गेल्या आठवड्यात फडणवीस यांनी लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. मात्र अद्याप लेखी 
आश्वासन न मिळाल्याने लिंगायत समाज रस्त्यावर उतरलायय... या मोर्चात लिंगायत समाजामधील खासदार आणि आमदार देखील सहभागी होणार असणार असल्याची माहिती  मिळतेय..  लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी, केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आलंय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola