Thane | ठाण्यात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी LRT चा प्रस्ताव

ठाण्याची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी लाईट अर्बन रेल ट्रान्झिट प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याअंतर्गत ठाण्यात 26 किमी उन्नत मार्ग आणि 3 किमी भुयारी मार्गाची लाईट मेट्रो धावणार आहे.
वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या ठाणेकरांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी ठरत आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा नवा पर्याय समोर आला आहे. ज्या धर्तीवर ठाण्यात एलआरटी म्हणजेच 'लाईट अर्बन रेल ट्रान्झिट' प्रकल्प राबवण्यात येणार आहे. सुरुवातीला 3 कार रेल आणि नंतर 6 कार रेल डब्यांचीही लाईट मेट्रो ठाण्यात धावेल.
तब्बल 7 हजार 165 कोटींच्या या प्रकल्पामुळं ठाण्यातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. ही लाईट मेट्रो प्रतितास 80 किमी वेगानं धावेल. मेट्रोची ताशी प्रवासी क्षमता 23 हजार 320 इतकी असेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola