Navi Mumbai Bus Library : नवी मुंबई मनपाचा अभिनव उपक्रम, आता बस मध्ये ग्रंथालयाची स्थापना
Continues below advertisement
नवी मुंबई महानगरपालिकेने लेट्स रीड फाउंडेशनच्या सहकार्याने अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. नवी मुंबई पालिका बसेसमध्ये आता ग्रंथालयाची स्थापना करण्यात आलेय. ज्या बस लांब पल्याच्या मार्गिकेवर धावतात त्या बसेस मध्ये प्रवाश्यांसाठी ग्रंथालयाची सोय करण्यात आलीय. इंग्रजी, मराठी मधील नामवंत लेखकांची पुस्तके या ग्रंथालयात ठेवण्यात आलीत. नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, प्रवास करताना वेळ मोबाईलमध्ये न घालवता वाचन करावं या दृष्टीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
Continues below advertisement