Lalbaug Cha Raja ला मोठ्या प्रमाणात देणगी; भक्तांनी दिलेल्या देणगीची मोजणी सुरु
मुंबईत लालबागच्या राजाला भक्तांनी यावर्षीही भरभरून दान दिलंय... भक्तांनी रोख रकमेत आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या रुपात राजाला दान दिलंय.... त्याची मोजदाद आजपासून सुरु झाली. भक्तांनी रोख रकमेत मोठ्या प्रमाणात दान दिलंय. जमा झालेल्या नोटांची मशिन्सद्वारे मोजणी करण्यात येतेय. याशिवाय सोन्याची फुलं, सोन्याचे चरण, हार, अंगठी, मुकूट, कडं असे सोन्याचे दागिनेही लालबागच्या राजाला भक्तांनी दान दिलेत. चांदीचा गणपती, चांदीचा मोदक, चांदीच्या दुर्वा अशा चांदीच्या वस्तूही भक्तांनी राजाला अर्पण केल्यात. सोन्याचांदीच्या या वस्तूंचा नंतर लिलाव केला जातो. त्यातून जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. ((याशिवाय दानपेटीत चिठ्ठ्या टाकून भाविकांनी लालबागच्या राजाला आपल्या मनातल्या भावनाही कळवल्या आहेत. ((आज राजाला दान केलेल्या एका घराच्या प्रतिकृतीबरोबर पाठवलेल्या चिठ्ठीत घराचं स्वप्न पूर्ण झाल्यानं घराची प्रतिकृती अर्पण करत असल्याचं नमूद केलंय. गणेशोत्सव संपेपर्यंत राजाच्या भक्तांकडून येणाऱ्या या दानाची मोजदाद रोज सुरु राहणार आहे.