Kolhapur : करवीर निवासिनी अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा सोहळा ABP Majha
'अंबा माता की जय' अशा जयघोषात करवीर निवासिनी अंबाबाईच्या नगरप्रदक्षिणा सोहळ्याला सुरुवात झालीय. नगरप्रदक्षिणा म्हणजे देवी शहरवासीयांच्या भेटीसाठी मंदिरातून बाहेर पडते असे मानले जाते. मुख्य प्रवेशद्वारातून निघालेली नगरप्रदक्षिणा महाद्वार रोड मार्गे गुजरीतून बिनखांबी गणेश मंदिरापासून देवीची ही प्रदक्षिणा पुन्हा मंदिरात पोहोचते. यावेळी भाविकांनी नगरप्रदक्षिणेच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या घालून देवीचं स्वागत केलं. नगरप्रदक्षिणा घालणाऱ्या देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. फुलांची उधळण करत भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं.
Tags :
Kolhapur Nagar Pradakshina Shree Karveer Niwasini Ambabai Kolhapur Mahalaxmi Shree Ambabai Temple