Kishori Pednekar: महापौर किशोरी पेडणेकरांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर ABP Majha
Continues below advertisement
राणीच्या बागेतल्या पेंग्विनभोवतीचं राजकारण काही केल्या थांबत नाहीये. काही दिवसांपूर्वी पेन्ग्वीनच्या नव्या पिल्लाचं नामकरण झाल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केलं. मात्र या पेन्ग्विनच्या ऑस्कर या नावावर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आणि ट्वीट करत महापौर किशोरी पेडणेकर यांना टोमणाही मारला. मराठी पाट्यांचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला पेंग्विनचं नाव मराठीत ठेवता आलं नाही का असा प्रश्न चित्रा वाघ यांनी केलाय. यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलंय. नावावरून इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नका असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितंलय.
Continues below advertisement