Mumbai Mayor | महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल | ABP Majha

Continues below advertisement
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगपालिकेच्या महापौरपदाची माळ शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांच्या गळ्यात पडलीये. तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
किशोरी पेडणेकर आणि यशवंत जाधव यांच्यात महापौरपदासाठी शर्यत होती. जाधव आणि पेडणेकरांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. पक्षश्रेष्ठींनी पेडणेकरांना ग्रीन सिग्नल दिल्यानंतर पेडणेकरांनी संध्याकाळी महापौरपदासाठी अर्ज भरला. दरम्यान महापौरपदासाठी भाजपनं अर्ज दाखल न केल्यानं शिवसेनेचाच महापौर मुंबई महापालिकेवर बसणार हे निश्चित आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनंही अर्ज न भरल्यानं पेडणेकरांची बिनविरोध निवड होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram