kirit Somaiya on Kishori Pednekar : हिशोब तर द्यावाच लागणार : किरीट सोमय्या
शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या कथित एसआरए घोटाळा प्रकरणात अडणीत येण्याची शक्यता आहे. पेडणेकर यांनी मुंबईतल्या दादर पोलिसांनी आज चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांची दादर पोलीस ठाण्यात १५ मिनिटं चौकशीही झाली. किशोरी पेडणेकर यांना या प्रकरणात उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणात जून महिन्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यात पेडणेकरांचं नाव नव्हतं. पण या प्रकरणात झालेल्या पोलीस चौकशीनंतर चारजणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक व्यक्ती माजी महापौरांची निकटवर्तीय आणि दुसरी व्यक्ती मुंबई महापालिकेची कर्मचारी असल्याची माहिती आहे. त्या दोघांनी आपल्या जबाबात माजी महापौरांचं नाव घेतल्याचा संशय आहे. यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एसआरएमध्ये फ्लॅट मिळवण्यासाठी आपल्याकडून पैसे घेतल्याची तक्रार नऊजणांनी केली आहे. पण लाच देऊनही त्यांना फ्लॅट मिळालेले नाहीत. या नऊजणांकडून मिळालेल्या रकमेचा वाटा पेडणेकरांना देण्यात आल्याचा आरोप आहे. त्याच अनुषंगानं त्यांची पहिल्यांदा चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांच्या चौकशीवरून काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात..