Kirit Somaiya Anticipatory Bail Application in HC : किरीट सोमय्यांची अटकपूर्व जामीनासाठी धावाधाव

Kirit Somaiya Anticipatory Bail Application in HC : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अटकपूर्व जामीनासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) बचाव मोहिमेसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी सोमय्या यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत मुंबई सत्र न्यायालयानं त्यांची अटकपूर्व जामीनासाठीची याचिका सोमवारी फेटाळून लावली होती. त्या निकालाला सोमय्यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती अनूजा प्रभूदेसाई यांच्यासमोर यावर आज सुनावणी पार पडणार आहे. याप्रकरणी सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांचीही जामीन याचिका मंगळवारी फेटाळण्यात आली. मात्र त्या निकालाची प्रत संध्याकाळी उशिरनं प्राप्त झाल्यानं आज केवळ किरीट सोमय्या यांच्याच याचिकेवर हायकोर्टात (High Court) सुनावणी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, पुढील चार दिवस आलेल्या सलग सुट्यांमुळे हायकोर्टाचं नियमित कामकाज बंद राहील, त्यामुळे अटकेची टांगती तलवार रोखण्यासाठी आजची सुनावणी सोमय्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola