Kiran Joglekar : अमेरिकेतही मराठीचा झेंडा रोवणारे किरण जोगळेकर यांचं निधन
संगीत, क्रिकेट, समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात सहज मुशाफिरी करणारं अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले किरण जोगळेकर यांचं हृदयविकारानं निधन झालं. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी अमी आणि मुलगा सोहम असा परिवार आहे.