Khargar Accident Maharashtra Bhushan : दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या श्री सेवकांचा पोस्टमॉर्टम अहवाल

Continues below advertisement

खारघर दुर्घटनेबाबत महत्त्वाची बातमी आहे.. दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या १४ पैकी १२ जणांनी ६ ते ७ तासांपासून काहीच खाललं नव्हतं, असं पोस्ट मॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उर्वरित दोन जणांनी काही खाललं होतं की नाही ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यातील काहींना आधीपासून व्याधी होत्या.. ज्यामुळे वेळेवर न खाणं आणि प्रचंड ऊन याची भर पडली, आणि त्यांचा मृत्यू झाला. उन्हात बसलेल्या लोकांना पाण्यानंही काही फरक पडला नसता, त्यांना सावलीचीच गरज होती, असं पोस्ट मॉर्टम करणाऱ्या एका डॉक्टरनं सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे पुरस्कार सोहळ्याच्या एक दिवस आधी पनवेल जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पाहणीसाठी गेले होते. पाहणी करताना त्यांनाही उन्हाचा त्रास झाला. पण ही महत्त्वाची बाब त्यांनी वरिष्ठांना सांगितली नाही, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram