khalapur Toll Naka | मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा

Continues below advertisement

मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर तीन ते चार किलोमीटरच्या लांबच-लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. दिवाळीमुळे मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या एक तासापासून वाहनांची मोठी रांग पाहायला मिळत आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. कारण दिवाळीच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी बाहेर पडत आहेत. विशेषतः चाकरमानी दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपल्या घरी केल्यानंतर आपल्या गावाकडे जातात. अशातच चाकरमान्यांनी आपल्या गावाकडची वाट धरली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गाड्यांची गर्दी मुंबई-पुणे महामार्गावर झाली असून खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram