Kalyan Coronavirus | जंगी विवाह सोहळ्याचं आयोजन; पालिकेकडून आयोजकांवर गुन्हा दाखल
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील कल्याणमध्ये लागू केलेले निर्बंध नागरिक पायदळी तुडवताना दिसतायत. कोरोनाकाळात जंगी विवाह सोहळा आयोजीत केल्याप्रकरणी पालिकेन आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पूर्वेत काल संध्याकाळी हा जंगी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्याठिकाणी ७०० पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती होती. पालिकेच्या प्रशासनाला याची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कोरोनाे नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं यावेळी समोर आलं. त्यामुळं आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.