Coronavirus | कर्नाटकात परीक्षा केंद्रावर खबरदारी घेऊनही दहावीच्या 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
कर्नाटकात दहावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे तर 80 विद्यार्थ्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षा हॉलमध्ये जाताना विद्यार्थ्यांना हँड सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले होते. शिवाय वर्गात सगळीकडे सॅनिटायझेशन करत फवारणी करण्यात आली होती. तसेच कन्टेंन्मेंट झोनमधून आलेल्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वेगळी करण्यात आली होती. तरीही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.