'कांजूरची जागा राज्य सरकारचीच, चंद्रकांत पाटील यांची दस्ताऐवजांवर स्वाक्षरी', अब्दुल सत्तारांचा दावा
Continues below advertisement
कांजूरमार्गची मेट्रो कार शेडची जागा महाराष्ट्र सरकारची असल्याचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या दाव्याला दुजोरा देणारा कागदोपत्री पुरावा शासनालेखी असल्याचं महसूल व खार जमीन विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे..विशेष म्हणजे तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दस्ताऐवजांवर स्वाक्षरी केल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे.
त्या जागेवरून शिवसेनेचे राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तत्कालीन महसूल मंत्री असतांना चंद्रकांत पाटलांनी कांजूरमार्गची खारफुटीची जमीन राज्य सरकारची असल्याचं मान्य केलं होतं. अब्दुल सत्तार यांच्याकडे कागदोपत्री पुरावा असल्याचा दावा ते करत आहेत. तशी अधिकृत माहिती त्यांच्या विभागातून प्राप्त झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच चंद्रकांत पाटील खोटारडे असल्याचाही आरोप सत्तार यांनी केला आहे.
Continues below advertisement