UPSC Student | दिल्लीत अडकलेले यूपीएससीचे विद्यार्थी राज्यात परतले
लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून दिल्लीत अडकून पडलेले यूपीएससीचे विद्यार्थी काल रात्री उशिरा कल्याणमध्ये परतले. या विद्यार्थ्यांनी दिल्ली सरकार आणि रेल्वेच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केलीय..स्क्रीनिंग टेस्टसाठी तब्बल १० तास बसवून ठेवलं, रेल्वेत बसताना फूड पॅकेट्स दिले नाहीत, रेल्वेनं रात्रीचं जेवण सुद्धा दिलं नाही अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केलीय..रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनीही संताप व्यक्त केलाय..