...जेव्हा भाजपच्या कार्यक्रमात अचानक शिवसेनेचे खासदार पोहोचतात
कल्याण : मला बोलावले नसले तरी मी आलोय. सध्या सोशल डिस्टन्सिंग कितीही असलं तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढायला नको, असा सल्ला शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजप आमदार व नगरसेवकांना दिला. कल्याण पूर्वेतील भाजपच्या चौक नामांतरांच्या कार्यक्रमाला अचानक खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांना पाहून उपस्थित सर्वच आश्चर्यचकित झाले. श्रीकांत शिंदे यांनी मी याच रस्त्याने जात होतो कार्यक्रम पाहिला, नगरसेवक आमदार दिसले टाळून जाणे बरोबर वाटलं नाही, म्हनून आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.