Thane Traffic Issue | वाहतूक कोंडीबाबत मनसे आमदार राजू पाटलांकडून मनपा आयुक्तांची भेट | ABP Majha
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील प्रलंबित समस्यांकडे लक्ष घालण्यास नवनिर्वाचित मनसे आमदार राजू पाटलांनी आता सुरूवात केली आहे. आज राजू पाटलांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा काही भाग कल्याण महापालिका, ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेच्या अख्त्यारित येतो. त्यामुळे दिवा, दातिवली आणि शिळफाटा या भागातील समस्यांबाबत ठाणे मनपा आयुक्तांशी राजू पाटलांनी चर्चा केली.